Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

Vinayak Mete: ज्या कारने केला मेटेंचा घात; ‘ती’ लोकप्रिय कार कितपत सुरक्षित?

0 350

Vinayak Mete : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नेहमीच पुढे असणारे शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे आज सकाळी 14 ऑगस्टला मुंबईला जात असताना अपघाती निधन झाले. त्यांच्या या निधनानं राज्य शोकग्रस्त झाले आहे. त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितले की, त्यांच्या गाडीला एक मोठ्या वाहनाने बाजून धडक दिली आणि मग गाडी मोठ्या गाडीसोबत फरफटत गेली.

देशभरातील जवळपास सर्वच नेते हे महागड्या गाड्या वापरत असतात. कारण या गाड्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगल्या असतात असे मानले जाते. मात्र, विनायक मेटे यांच्या या अपघाती निधनामुळे गाड्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मेटे हे फोर्ड एंडेव्हर (Ford Endeavour) मधून मुंबईला जात होते. याच गाडीचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या लेखात आपण या गाडीच्या सुरक्षिततेबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया!

Ford ही नावाजलेली अमेरिकन कार उत्पादक कंपनी आहे. महत्वाचे म्हणजे अलीकडेच काही दिवसांपूर्वी Ford ने भारतातून काढता पाय घेतला आहे. Ford कंपनीच्या गाड्या भारतासह अनेक मोठ्या देशांत लोकप्रिय आहेत. आंतराष्ट्रीय मार्केट मध्ये गाड्या विकण्यासाठी Ford कंपनीला अनेक महत्वपूर्ण सुरक्षा चाचण्या पास कराव्या लागतात. विशेष म्हणजे Ford च्या गाड्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित मानली जाते.

- Advertisement -

(🚘  गाड्यांच्या ऑफर, माहिती आणि बातम्या मिळवण्यासाठी ‘द गाडीवालाच्या’ या व्हाट्सएप ग्रुपला लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- https://chat.whatsapp.com/ET2sPAVaSOc2Zn6lxhBItw )

विनायक मेटे ज्या गाडीत प्रवास करत होते, ती फोर्ड एंडेव्हर (Ford Endeavour) सुद्धा अनेक सुरक्षा चाचण्यांमध्ये चांगले गुण असलेली SUV आहे.  विशेष म्हणजे या गाडीने सर्वात विश्वासू चाचण्यांपैकी एक ऑस्ट्रेलियन NCAP चाचणीमध्ये 5 पैकी 5 स्टार मिळवले होते. तसेच या गाडीने अन्य सुरक्षा चाचण्यात एकूण 37 गुणांपैकी 35.38 गुण मिळवले होते. सर्व सुरक्षा चाचण्या किमान 64 किमी प्रतितास वेगाने गाडीला क्रॅश करवून घेतल्या होत्या.

फोर्ड एंडेव्हर (Ford Endeavour) प्रत्येक सुरक्षा चाचण्यांमध्ये पास झालेली गाडी आहे. तसेच इतर सुरक्षा फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास या गाड्यांमध्ये सर्व बाजुंनी  एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत, जेणेकरून कोणत्याही बाजून अपघात झाला तरी आतील प्रवासी वाचला पाहिजे.

सर्व सुरक्षा चाचण्यांमध्ये अव्वल असून देखील या अपघातात विनायक मेटे यांच्या मृत्यनं उलट-सुलट चर्चांना ऊत आले आहे. विनायक मेटे आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बीड ते मुंबई प्रवास करत होते. कारण त्यांना मुंबई मध्ये मराठा आरक्षणा संबंधी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहायचे होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.