Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

Price of Ola s1 Electric Scooter: Ola S1 Electric Scooter चे 499 रुपयांत करा बुकिंग; बजेटमध्ये किंमत, 141 किलोमीटर मायलेज

0 1,259

Price of Ola s1 Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) भारतात नवीन S1 EV लाँच केली असून त्याची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. कंपनीच्या बाजारात दोन इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. त्यापैकी एंट्री लेव्हल ओला एस १ इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री कंपनीने काही काळासाठी थांबवली होती. मात्र आता कंपनीने ही स्कूटर रि-लाँच केली आहे.

नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखीच आहे. आता ओलाने एक तगडी ऑफर देऊ केली आहे ती म्हणजे, 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान ही स्कूटर तुम्ही 499 रुपयांमध्ये बुक करू शकता. नवीन Ola S1 ची खरेदी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल. सध्याच्या मार्केटमध्ये ही स्कूटर Ather 450X, Simple One, TVS iQube आणि Okinawa Okhi 90 सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.

नवीन Ola S1 मध्ये 2.98kWh बॅटरी पॅक असेल. तिचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. EV निर्मात्याचा दावा आहे की, नवीन Ola S1 पूर्ण सिंगल चार्जवर 141 किमीची रेंज देऊ शकते. नवीन S1 मध्ये मूवओएस वैशिष्ट्ये मिळतील, जसे की म्युझिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, कंपेनियन अॅप आणि रिव्हर्स मोड. नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखी दिसते, ज्याचे डिझाइन बरेचसे समान आहे. ही स्कूटर चार रंगांमध्ये उपलब्ध केली जाईल, जेट ब्लॅक, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट हे रंग असतील.

Ola S1 लाँच करण्यासोबतच, कंपनीने S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी नवीन ‘खाकी’ रंग देखील जाहीर केला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचे औचित्य साधून ‘खाकी’ रंगात Ola आता S1 Pro च्या 1947 युनिट्सचे उत्पादन करत आहे. Ola S1 Pro खाकी एडिशनची किंमत 1.49 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

- Advertisement -

यासोबतच ओला इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक कारही सादर केली, जी 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, ही भारतात बनवलेली सर्वात स्पोर्टी दिसणारी कार असेल. अग्रवाल यांनी दावा केला की ओलाची इलेक्ट्रिक कार 4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते आणि 500 ​​किमी पेक्षा जास्त मायलेज देईल. नवीन ओला इलेक्ट्रिक कारमध्ये असिस्टेड ड्राइव्ह टेक्नॉलॉजी, कीलेस ऑपरेशन आणि ओलाचे मूव्ह ओएस हे वैशिष्ट्य असेल.

कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पुढच्या वर्षीपर्यंत कंपनी त्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचा आपल्या वाहनांमध्ये वापर करेल ज्या त्यांनी स्वतः भारतात बनवल्या आहेत. कंपनी आपल्या स्कूटर्समध्ये लिथियम बॅटरी वापरणार नाही. कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सोडियम, सिलिकन आणि इतर पर्यायांवर काम करत आहे.

हे पण वाचा: Honda CB300F Launched: Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी होंडा तयार, लाँच केली ‘ही’ 300cc ची जबरदस्त बाईक

🚘  गाड्यांच्या ऑफर, माहिती आणि सर्व बातम्या मिळवण्यासाठी ‘द गाडीवालाच्या’ या व्हाट्सएप ग्रुपला लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- https://chat.whatsapp.com/ET2sPAVaSOc2Zn6lxhBItw

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.