Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

PM Modi Car Price : पंतप्रधान मोदी वापरतात जगातील सर्वात ‘खतरनाक’ कार; किंमत आणि फीचर्सवर बसणार नाही विश्वास

0 1,758

PM Modi Car Price : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वत्र तिरंगा दिसून येत आहे. घर घर तिरंगा ही मोहीम जोरदार झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 ऑगस्टला सकाळी लाल किल्ल्यावरून रवाना झाले, तेव्हा साऱ्या जगाच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. लाल किल्ल्यावर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची एंट्री रेंज रोव्हर सेंटिनेलमधून (Range Rover Sentinel) झाली होती, तेव्हा अनेकांचे लक्ष या कारने वेधून घेतले. ही कार (PM Modi Car) जगातील सर्वात सुरक्षित आणि खतरनाक कार्सपैकी एक आहे.

पंतप्रधान मोदींची रेंज रोव्हर सेंटिनेल (Range Rover Sentinel) कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचा सहज सामना करण्यास सक्षम आहे. यामुळेच सध्या ती जगातील सर्वात सुरक्षित कार मानली जाते. हे एक चिलखती वाहन आहे, जे बॉम्ब आणि बंदुकीच्या गोळ्यांचा हल्ला सहन करण्यास सक्षम आहे. पीएम मोदींची ही कार IED स्फोटही सहज सहन करू शकते यावरून तिचे सेफ्टी फीचर्स लक्षात येऊ शकतात.

टायर खराब झाले तरी ही कार 100 किमीपर्यंतचे अंतर सहज पार करू शकते. पाणी, चिखल आणि खडकांवरही ही कार सहजतेने चालवता येते. पीएम मोदींच्या कारचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे, ही कार गॅस आणि केमिकल हल्ल्याला देखील निष्प्रभ करू शकते. म्हणजेच या कारमध्ये बसलेली व्यक्ती बॉम्ब आणि गोळ्यांपासून जेवढी सुरक्षित आहे, तेवढीच कोणत्याही प्रकारच्या रासायनिक हल्ल्यापासूनही सुरक्षित आहे.

- Advertisement -

Range Rover Sentinel ही जगातील सर्वात शक्तिशाली कार मानली जाते. याचे कारण म्हणजे ही कार Jaguar सोर्स्ड 5.0-लिटर, सुपरचार्ज्ड V8 इंजिनद्वारे चालविली जाते आणि या कारचे शक्तिशाली इंजिन 375bhp ची पॉवर आणि 508Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींच्या रेंज रोव्हर सेंटिनेलची किंमत 10 ते 15 कोटींच्या दरम्यान आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेनुसार आणि पसंतीनुसार अनेक फीचर्स कस्टमाइज करण्यात आले आहेत.

हे पण वाचाhttps://marathi.thegadiwala.in/price-of-ola-s1-electric-scooter/

🚘  गाड्यांच्या ऑफर, माहिती आणि सर्व बातम्या मिळवण्यासाठी ‘द गाडीवालाच्या’ या व्हाट्सएप ग्रुपला लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- https://chat.whatsapp.com/ET2sPAVaSOc2Zn6lxhBItw

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.