Ola Electric Car: इलेक्ट्रिक वाहने आता देशाचे भविष्य आहेत. आता रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र, ही वाढ केवळ मोठ्या शहरांमध्येच दिसून येत आहे, जिथे चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या वाहनांची रेंज कमी असल्याने लोक ती खरेदी करण्यास कचरतात.
मात्र, आता त्यांना जास्त विचार करण्याची गरज भासणार नाही. लवकरच एक इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होणार आहे, जिच्यामध्ये लांबचा प्रवास करण्याची क्षमता आहे. होय, आम्ही ओला इलेक्ट्रिक कारबद्दल बोलत आहोत. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार लाँग ड्राईव्हसाठी उत्तम पर्याय आहे.
ओला कंपनी 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या इलेक्ट्रिक कारच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 नवीन EV कारचे अनावरण करण्यासाठी सज्ज आहे. (Ola Electric Car Launch date)

- Advertisement -
ओला 15 ऑगस्ट रोजी इलेक्ट्रिक कारचे अनावरण करण्यासाठी सज्ज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही EV एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त अंतर कापेल. जे सध्याच्या इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. (Ola Electric Car driving range)
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक कार विषयी थोडक्यात माहिती दिलीय आणि त्यांच्या मते ही EV भारतातील सर्वात स्पोर्टी कार असेल. हे दावे नक्कीच मोठे असले तरी, या EV ची कामगिरी महत्त्वाकांक्षी दाव्यांच्या पूर्तता करू शकेल की नाही? हे पाहण्यासाठी आम्हाला कार भारतीय बाजारपेठेत येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
जर कंपनीचे दावे खरे ठरले, तर भारतीय बाजारपेठेत ही क्रांती काही कमी नसेल कारण लांब ड्रायव्हिंग रेंजमुळे या वाहनांची मागणी झपाटयानं वाढण्याची अपेक्षा आहे. जे पर्यावरण रक्षणासाठी मदत करेल!
हे पण वाचा: इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचं लायसन्स झालं स्वस्त, तरुणांना कमी भांडवलात मोठी कमाई
- Advertisement -