Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

Maruti Suzuki CNG Variant: तब्बल 31 किमी माइलेज सह Swift छे CNG मॉडल लॉंच, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स!

0 34

Maruti Suzuki CNG Variant: मारुतीच्या हॅचबॅक गाड्या निर्विवादपणे भारतीय रस्त्यावर राज्य करत आहेत. हे विधान अतिशयोक्ती वाटत असले तरी हे खरे आहे. कारण आपल्या स्वस्त किंमतीत जबरदस्त फीचर्स आणि जास्त मायलेज देण्यात मारुती पटाईत आहे. त्यामुके बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकं मारुतीच्या गाड्यांना पहिली पसंती देतात.

यातच महत्त्वाचे म्हणजे मारुती आपल्या सर्व गाड्यांमध्ये नेहमीच गरजेचे अपडेट्स आणत असते आणि आपल्या ग्राहकांना आकर्षित करत असते. यातच मारुतीने आपल्या ग्राहकांना आणखी एक चांगली बातमी दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही खास बातमी…

Maruti Suzuki CNG Variant

 

मारुती सुजूकीची पेट्रोल-डिजल आणि CNG गाड्यांच्या सेगमेंट मध्ये जणू मक्तेदारी आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक किंवा CNG गाड्यांना पसंती देत आहेत। इलेक्ट्रिक गाड्या महाग असल्याने मारुती CNG सेगमेंट मध्ये सुद्धा झपाट्याने वाढ करत आहे.

- Advertisement -

मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुतीने आपल्या सर्वात प्रसिद्ध गद्यांपैकी एक Swift चे CNG मॉडेल बाजारात आणले आहे. विशेषतः या गाडीचे मायलेज तब्बल 31 किलोमीटर प्रति एक किलो CNG असणार आहे. नक्कीच सामान्य कुटुंबातील लोकांना ही गाडी परवडणारी ठरेल.

किंमत

किमतीविषयी बोलायचे झाले तर या गाडीची किंमत 7 लाख 70 हजार रुपयांपासून सुरू होते. ही दिली येथील एक्स शोरूम किंमत आहे. कंपनीने वेगवेगळ्या मॉडेल मध्ये CNG उपलब्ध करून दिला आहे. VXi मॉडेलची किंमत 7, 70,000 आणि ZXi CNG मॉडेलची किंमत 8,45, 000 आहे.

फीचर्स

स्विफ्टच्या CNG मॉडेल्ससाठी 1.2 लिटरचे ड्युअलजेट, ड्युअल VVT इंजिन देण्यात आले आहे. ह्या इंजिनची क्षमता धमाकेदार आहे. यात 77.49 एवढी पावर आणि 98.5 nm चा torq जनरेट करण्याची क्षमता आहे. गाडीचे मायलेज 30.90 किलोमीटर प्रति एक किलोग्राम CNG एवढे आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.