Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

Maruti Suzuki Alto K10 Booking Started: मारुतीची शान Alto च्या नव्या मॉडेलचे प्री-बुकिंग सुरु, कमी किमतीत जबरदस्त फीचर्स!

0 8

Maruti Suzuki Alto K10 Booking Started: मारुती सुझुकीच्या नवीन Alto K10 चे प्री-बुकिंग सुरु झाले आहे. ज्या ग्राहकांना ते खरेदी करायचे आहे ते शोरूमला भेट देऊन किंवा ऑनलाइन बुक करू शकतात. अल्टो हे मारुती सुझुकी इंडियाचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे.

 

मारुती सुझुकीच्या नवीन Alto K10 चे प्री-बुकिंग सुरु झाले आहे. ज्या ग्राहकांना ते खरेदी करायचे आहे ते शोरूमला भेट देऊन किंवा ऑनलाइन बुक करू शकतात. अल्टो हे मारुती सुझुकी इंडियाचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे.

 

कधी होईल लाँच?

मारुतीची नवीन Alto K10 11,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 18 ऑगस्टला हि गाडी लाँच करू शकते. अल्टो 800 आणि K10 या दोन मॉडेलमध्ये लॉन्च होणार आहे. अल्टोच्या यशाबद्दल बोलताना कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव म्हणाले, अल्टो हा 4.32 दशलक्ष ग्राहकांसह देशातील सर्वात प्रभावशाली ब्रँड आहे.

 

असे असतील फीचर्स!

 

- Advertisement -

मारुतीच्या नवीन अल्टोचे K10 मॉडेल अनेक बदलांसह लॉन्च होणार आहे. गाडीच्या आउटलूकबद्दल बोलायचे झाले तर हि कार मारुतीच्या सेलेरियोसारखे दिसते. काही दिवसांपूर्वी या कारच्या अॅड शूटदरम्यान अल्टोचे काही फोटो समोर आले होते. ते होतो पाहून ही गाडी सेलेरिओ सारखी दिसत असल्याचे स्पष्ट झाले.

नवीन मारुती अल्टो सध्याच्या पिढीच्या अल्टोपेक्षा थोडी मोठी असेल अशीही अपेक्षा आहे. पुढील पिढीतील अल्टोने बूट स्पेस आणि ग्राउंड क्लीयरन्स देखील वाढवले ​​असल्याचे सांगितले जाते. BS6 उत्सर्जन नियम लागू झाल्यानंतर मारुतीने एप्रिल 2020 मध्ये Alto K10 बंद केली होती.

 

नवीन अल्टोमध्ये इंजिनपासून ते डिझाइनपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन अल्टो मॉड्युलर हार्टटेक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. सेलेरियो आणि वॅगनआर देखील या प्लॅटफॉर्मसह बाजारात आहेत.

 

आता पुढील फीचरबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन अल्टोमध्ये दोन इंजिन पर्याय मिळू शकतात. हे नवीन 1.0L DualJet पेट्रोल इंजिनसह लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. जे 67hp ची पॉवर आणि 89Nm कमाल टॉर्क जनरेट करते. याशिवाय, अल्टो आधीपासून अस्तित्वात असलेल्या 796cc पेट्रोल युनिटसह येऊ शकते, जे 47hp पॉवर आणि 69Nm कमाल टॉर्क जनरेट करते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.