Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

Indian Flag Rules and Regulations in Marathi : गाडीवर तिरंगा लावताय? ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, अन्यथा तुरुंगवारी पक्की

0 1,442

मुंबई :

15 ऑगस्ट 2022 रोजी सर्व भारतीय लोक देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत मोदींनी सर्व भारतीयांना घरोघरी राष्ट्रध्वज (तिरंगा) फडकवण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान मोदींनी नागरिकांना सांगितले आहे की, 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपण आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा फोटो प्रोफाइल पिक्चर म्हणून वापरावा. पंतप्रधान मोदी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले, “जेव्हा भारताला स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आपल्या सर्वांना एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण दिसेल.” त्यामुळेच मोदींनी सर्व भारतीयांना घरोघरी तिरंगा मोहिमेत सहभागी होण्यास सांगितले आहे.

मोदींच्या विनंतीनंतर अनेकांनी घरोघरी तिरंगा ध्वज फडकवायला आणि सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचे फोटो प्रोफाईल पिक्चर म्हणून पोस्ट करायला सुरुवात केली आहे. अनेकजण याच्याही पुढे गेले आहेत. अनेक लोक त्यांच्या दुचाकी, कार आणि इतर वाहनांवर राष्ट्रध्वज लावत आहेत. (Indian Flag Rules and Regulations in Marathi) अनेकांनी आपल्या बाइकसह इतर वाहनांवर देखील राष्ट्रीय ध्वज लावला आहे. आपल्या वाहनांवर तिरंगा लावण्याचा लोकांचा हेतू चुकीचा असू शकत नाही, मात्र त्याविरोधातील कारवाई त्यांना अडचणीत आणू शकते कारण भारतीय राष्ट्रध्वज हूड, टॉप आणि बाजूला किंवा मागच्या बाजूला गुंडाळणे कायद्याचे उल्लंघन आहे.

- Advertisement -

भारतीय ध्वज संहितेनुसार, वाहन, ट्रेन, बोट, विमान किंवा इतर कोणत्याही तत्सम वस्तूच्या हुडवर, बाजूला (डावीकडे किंवा उजवीकडे) भारतीय राष्ट्रध्वज गुंडाळणं हा भारतीय राष्ट्रध्वजाचा अनादर मानला जातो. भारतीय ध्वज संहितेनुसार(Flag Code Of India), या कायद्याचे पालन न करणाऱ्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.
(🚘  गाड्यांच्या ऑफर, माहिती आणि बातम्या मिळवण्यासाठी ‘द गाडीवालाच्या’ या व्हाट्सएप ग्रुपला लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- https://chat.whatsapp.com/ET2sPAVaSOc2Zn6lxhBItw )

कायदा इथेच संपत नाही. राष्ट्रध्वज हा तीन आयताकृती पटल किंवा समान रुंदीच्या पट्ट्यांचा बनलेला तिरंगा पॅनेल असेल. ज्यामध्ये वरच्या पॅनलचा रंग भगवा आणि खालच्या पॅनेलचा रंग हिरवा असेल. दोघांमध्ये एक पांढरा फलक असेल. या पांढऱ्या फलकाच्या मध्यभागी निळे अशोक चक्र असेल.

तिरंग्याचा आकार किती व कसा असावा:

भारतीय ध्वज संहिता असेही सुचवते की, प्रदर्शनासाठी योग्य आकार निवडावा. व्हीव्हीआयपी फ्लाइटमध्ये विमानासाठी 450 X 300 मिमी, मोटार कारसाठी 225 X 150 मिमी आणि टेबलसाठी 150 X 100 मिमी आकाराचा ध्वज असावा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.