Honda Activa 7G First Look: प्रसिद्ध स्कूटर ACTIVA आता नवीन अवतारात, Honda ने जारी केला Activa चा नवा लुक!
Honda Activa 7G First Look: जेव्हा कोणी भारतात स्कूटरबद्दल बोलतो, तेव्हा सर्वांच्या नजरेसमोर फक्त एकच सकूटर दिसते आणि ती म्हणजे Honda Activa. भारतीयांकडून जे प्रेम या स्कूटरला मिळतं, ते क्वचितच दुसऱ्या स्कूटरला मिळतं. दरम्यान, जर तुम्ही Activa घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
अॅक्टिव्हा ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. होंडाने आपल्या सर्वात प्रसिद्ध स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च करण्याची तयारी पूर्ण केली आहे. आता तुम्हाला कधीही बाजारात Activa चे नवीन मॉडेल बघायला मिळू शकते. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…
होंडाने अलीकडेच ‘Coming Soon’ या कॅप्शनसह सोशल मीडियावर स्कूटरचा टीझर लॉन्च केला आहे. टीझरमध्ये स्कूटरचा समोरील भाग पाहायला मिळतो. या टीझरमध्ये संपूर्ण स्कूटर दिसत नसली तरी समोरचा भाग दाखवण्यात आला आहे. हे स्टँडर्ड अॅक्टिव्हासारखेच आहे.
- Advertisement -
Raise the bar with style that is unlike any other. Stay tuned! pic.twitter.com/u9RwNWe48F
— Honda 2 Wheelers (@honda2wheelerin) August 9, 2022
स्कूटर सेगमेंटमध्ये होंडाच्या दुचाकींची चांगली विक्री होत आहे. सणासुदीच्या काळात विक्रीला आणखी चालना देण्यासाठी ‘Activa 7G’ हे नाव आता समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्कूटरची अधिकृत लॉन्च तारीख अद्याप समोर आलेली नाही. दसरा किंवा दिवाळीच्या सणासुदीत ते सुरू होणार आहे. (Honda Activa 7G Launch Date)
6G च्या तुलनेत Honda 7G मध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. कंपनीने Activa 6G मध्ये BS6 दिले होते आणि ते एक मोठे अपडेट होते. मात्र, Activa 7G ला तीच जुनी पॉवरट्रेन मिळण्याची शक्यता आहे. यात 110cc इंजिन मिळेल, जे 7.68 bhp आणि 8.79 Nm जनरेट करण्यास सक्षम असेल. (Honda Activa 7G all specification)
Honda Activa 7G मध्ये 6G सारख्या सर्व गोष्टी जसे की इंधन क्षमता, बूट स्पेस, 692 mm सीट उंची, सायलेंट स्टार्टर मोटर मिळेल. Honda Activa 7G ला सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि LED हेडलाइट्स Activa 6G च्या डिलक्स प्रकाराप्रमाणेच मिळण्याची शक्यता आहे.
- Advertisement -