Just another WordPress site

- Advertisement -

- Advertisement -

High Security Registration Plates HSRP: वाहनांवर आता HSR प्लेट बसवणार; टोलवर भरावी लागणार अर्धीच रक्कम

0 801

High Security Registration Plates HSRP :  केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मार्च 2022 मध्ये घोषणा केली होती की, 60 किमीपेक्षा कमी राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझा असणार नाहीत. त्यावेळी गडकरी म्हणाले होते की, येत्या 3 महिन्यात या नियमांची अंमलबजावणी केली जाईल. आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. दरम्यान, गडकरी यांनी आणखी एक घोषणा केली आहे. देशातील टोल प्लाझावर ही प्रक्रिया बंद होण्यापूर्वी देशातील सर्व जुन्या वाहनांमध्ये नवीन नंबर प्लेट लावण्यात येणार आहेत. ही नवी नंबर प्लेट टोल प्लाझा स्क्रॅप करण्याच्या दिशेने पहिले पाऊल असेल.

जीपीएस आणि अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून या नव्या नंबर प्लेट्सवर उपग्रहाद्वारे थेट लक्ष ठेवता येणार आहे. तसेच, वाहन किती किलोमीटर धावले आहे, त्यानुसार वाहनचालकांकडून टोल वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी फास्टॅग प्रणाली आपल्या देशात आधीपासून अस्तित्वात आहे. देशातील सुमारे 97 टक्के वाहनांनी फास्टॅग प्रणालीचा वापर सुरू केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही 2019 पासून नवीन वाहनांसाठी टेम्पर प्रूफ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) वापरण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून सरकारी यंत्रणांना वाहनांची संपूर्ण माहिती मिळणार आहे. आता जुन्या वाहनांसाठीही ही यंत्रणा सुरू होणार आहे. त्यामुळे जुन्या वाहनांवरही नव्या नंबर प्लेट लावण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या नव्या नंबर प्लेट जीपीएससोबत असतील.

गडकरी म्हणाले की, सध्या 60 किमी परिसरात दोन टोल प्लाझा आहेत, मात्र दोन्ही टोल प्लाझावर नागरिकांना पूर्ण टोल भरावा लागतो. पण आता तुम्ही महामार्गावरून फक्त 30 किमीचा प्रवास केलात तर नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्हाला अर्धा टोल आकारला जाईल, ज्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. गडकरी म्हणाले की, सरकार देशाला टोल प्लाझापासून मुक्त करण्यासाठी काम करत आहे. पण ही मोहीम अद्याप नियोजनाच्या टप्प्यात आहे.

- Advertisement -

या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना गडकरी म्हणाले की, टोल प्लाझावर वाहनांच्या लांब रांगा लागणार नाहीत. यामुळे प्रदूषण होणार नाही आणि नागरिकांच्या वेळेचीही बचत होणार आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहनचालकांच्या बँक खात्यातून थेट पैसे कापून घेतले जाणार आहेत. भारतातील सुमारे 97 टक्के वाहने आधीपासूनच फास्टॅगवर धावत आहेत. गडकरी म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधा अमेरिकेप्रमाणेच असतील.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, टोल प्लाझा हटवले म्हणजे हायवेवरील टोल टॅक्स भरावा लागणार नाही, असे होणार नाही. तुमच्या खात्यातून पैसे वजा करण्यासाठी नवीन प्रणाली प्रभावी ठरेल. जगभरातील अनेक देश या प्रणालीचा वापर करत आहेत. या यंत्रणेत महामार्गावर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या साह्याने वाहनचालकांकडून थेट शुल्क आकारले जाते. या कॅमेऱ्यांमुळे गाडीची नंबर प्लेट कळते, जी थेट कार मालकाच्या बँक खात्याशी जोडलेली असते. ही सर्व प्रक्रिया गाडी न थांबवता पूर्ण होऊन लोकांचा रस्ते प्रवास आणखी सुखकर होईल.

हे पण वाचाhttps://marathi.thegadiwala.in/price-of-ola-s1-electric-scooter/

🚘  गाड्यांच्या ऑफर, माहिती आणि सर्व बातम्या मिळवण्यासाठी ‘द गाडीवालाच्या’ या व्हाट्सएप ग्रुपला लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- https://chat.whatsapp.com/ET2sPAVaSOc2Zn6lxhBItw

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.