मुंबई :
दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असताना सामान्य जनतेला अजून एक झटका बसला आहे. पेट्रोल-डीझेल या पाठोपाठ सीएनजी आणि पीएनजीच्या (CNG, PNG Price hike) दरात वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. महानगर गॅस लिमिटेड या कंपनीने वाढ झाली असल्याचे जाहीर केले आहे. आता दरवाढीचा परिणाम मुंबईत वाहतूक व्यवसाय करणाऱ्या तसेच प्रवाशांवर होणार आहे.
- Advertisement -
वाढलेल्या किमतीनंतर आता सीएनजी प्रति किलोसाठी 86 रुपये मोजावे लागणार आहेत तर पीएनजी गॅस प्रति एससीएम 52 रुपये 50 पैसे या रेटने मिळणार आहे. आधीच महागाईने नको नको केले असताना पुन्हा नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने सामान्य माणसाच्या खिशाचा बोजा वाढणार आहे. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ झाली आहे.
दिवसेंदिवस होत असलेल्या गॅसच्या खर्चांच्या वाढीमुळे आम्हाला हा वाढता खर्च कव्हर करावा लागणार आहे. परिणामी दर वाढवणे, याशिवाय पर्याय नाही म्हणूनच आम्ही दर वाढवत आहोत. आम्ही CNG च्या किरकोळ किमतीत 6 रुपये (प्रति किलो) आणि घरगुती PNG (पाइप नॅचरल गॅस) च्या किरकोळ किंमतीत 4 रुपये (प्रति युनिट) वाढ केली आहे, अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडकडून मिळाली आहे.
- Advertisement -