Bajaj CT125X : कमी बजेटमध्ये दमदार बाईक, किंमत, मायलेज आणि फीचर्स पाहून विश्वास बसणार नाही!
Bajaj CT125X : भारतातील लोकप्रिय मोटरसायकल निर्माता बजाज आता एक नवीन बाईक लॉन्च करणार असल्याची बातमी समोर आली आहे. मायलेजवाल्या गाड्या बनवणारी बजाज कंपनी आता स्पोर्ट्स बाईक मध्ये अग्रेसर होत आहे. अशातच पुन्हा एकदा कंपनीने आपला मोर्चा मायलेज बाइक्सकडे वळवला आहे. बजाज आता 125 cc ची CT125X बाईक लाँच करणार आहे. (Bajaj CT125X launch date)
ग्रामीण भागात नावलौकिक असणाऱ्या बजाजने शहरी भाग टार्गेट केला आहे. आता ऑफिस काम करणाऱ्या लोकांना गृहीत धरून ही बाईक बनवली असल्याचे समजते. CT125X ही बाईक कमी किमतीत चांगले मायलेज देईल, असे समजत आहे. अशावेळी तुम्हीही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर चांगली बाईक लौंच होत आहे, त्यामुळे काही दिवस वाट बघा. या लेखात आपण या गाडीचे फीचर्स आणि किमतींबाबत जाणून घेणार आहोत. (Bajaj CT125X price)
डिझाइन :-
आगामी बजाज CT125X मध्ये सिंगल पीस सीट, USB चार्जर आणि नवीन ग्राफिक्स असतील. बाईकचे डिझाईन, इंजिन आणि इंजिन लेआउट सध्याच्या CT110X प्रमाणे दिसत आहे. सोशल मीडियावर नव्या गाडीचे व्हिडिओज वायरल होताना दिसत आहेत. (Bajaj CT125X design and specification)
- Advertisement -

रंगाबाबत बोलायचे झाल्यास या गाडीवर काळ्या आणि लाल शेड्स व्यतिरिक्त, नवीन ड्युअल-टोन ग्लॉसी ब्लॅक आणि ग्रीन शेड देखील देण्यात आला आहे. सध्याच्या CT110X च्या तुलनेत, आगामी CT125X ला बॉडी पॅनलवर नवीन ग्राफिक्स दिसतील.
CT125X नेहमीच्या टायर्ससह उपलब्ध होणार आहे. एकूणच पहिल्या नजरेत गाडीची मजबुती चांगली दिसत आहे. बाईकची किंमत जवळपास 80 हजार रुपये असू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदार वर्गासाठी ही गाडी नक्कीच उपयुक्त ठरेल.
हे पण वाचा: Honda CB300F Launched: Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी होंडा तयार, लाँच केली ‘ही’ 300cc ची जबरदस्त बाईक
🚘 गाड्यांच्या ऑफर, माहिती आणि सर्व बातम्या मिळवण्यासाठी ‘द गाडीवालाच्या’ या व्हाट्सएप ग्रुपला लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- https://chat.whatsapp.com/ET2sPAVaSOc2Zn6lxhBItw
- Advertisement -